नवीन सरकार आपल्या जुन्या प्राचीन सौंसकृती विषयी विशेष अभिमानी होते. जे आपले पूर्वज करून गेले, जो वारसा त्यांनी आपल्याला दिलाय, तोच आपण जतन ठेवला पाहिजे. आजकालच्या या औद्योगिक युगात आपली प्राचीन, देव देवतांनी बांधलेली समृद्धी यांचा विसर आपल्ल्याला पडला आहे याची खंत त्यांना होती. आणि बहुतांश इतिहासकार आणि सर्व धार्मिक लोक याशी सहमत होते. अचानक एक शोध लागला कि एका शहराच्या खाली देव देवतांनी बांधलेली, प्राचीन युगीन भव्य रचना आहे. पण सध्या त्यावर दोन तीन कापड गिरण्या उभ्या आहेत. पण शेवटी धार्मिक लोकांच्या प्रचंड आग्राहस्तव, आणि मोठ्या लोकांच्या आशिर्वादाने, त्या गिरण्या पाडण्यात आल्या. सगळा ढीगरा बाजूला सरल्यात आला आणि उत्खनन सुरू झले. वर्षभर खोदून, त्यांना हजारो वर्षांपूर्वीच्या वस्तू दिसल्या. बरेच सौशोधन करून कळले की हे त्या काळातील एक प्रगत शहर होते. आणि माधवर्ती भागात एक मोठी पुरतं काळातील कपडे निर्मिती करणारी यांत्री होती ते शहर हजारो लोकांचे राहणीमान होत, आणि देशाच्या व्यापाराच एक मूलभूत अंग होत.
हे पुरतं अवशेष पाहून लोकांना धन्य वाटले. आपल्याला लाभलेल्या या वरश्याबाबत लोक खूप अभिमान बाळगू लागले. देश-विदेशातून लोक हा वारसा बघायला यायला लागले, त्याच कौतुक करायला लागले, त्यापासून शिकायला हवे असा म्हणायला लागले. हे अवशेष जगास खूप काही देऊन जातील, असे जनमत बनले.
बाजूला एका झोपडीत आपला काम काढून घेतला कामगार आपला बायका पोरांना घेऊन आपल्या कापड गिरणीच अवशेष पाहत होता.